विपश्यना केंद्रातून परताच आरटी देशमुखांच्या जाण्याचं दुःख, धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी आज माजी आमदार आणि मुंडे समर्थक आर. टी. देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये झालेल्या अपघातात आरटी देशमुख यांचा मृत्यू झाला. आर. टी. देशमुख हे माजलगावचे माजी आमदार होते. मुंडे समर्थक नेते अशी त्यांची ओळख होती. गोपीनाथ मुंडेंनंतर ते पंकजा मुंडे यांचे ते खंदे समर्थक मानले जायचे. पंकजा यांच्या दसरा मेळाव्याला ते कायम उपस्थित असायचे. मुंडे कुटुंबियांच्या अत्यंत जवळच्या आरटी देशमुखांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळी धनंजय मुंडे हे मात्र विपश्यना केंद्रात होते. त्यामुळे देशमुखांच्या अंत्यविधिला ते उपस्थित नव्हते. मात्र विपश्यना केंद्रातून परताच सोमवारी धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.. यावेळी ते चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
Authored by: मानसी देवकरContributed by: दीपक जाधवUpdated: |Maharashtra Times