Gopinath Munde यांच्या जाण्याने DSP यांच्यासह पोलीस खातं रडलं; रामराव महाराजांकडून आठवणींना उजाळा

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज (३ जून) स्मृतिदिन आहे. दरवर्षी यादिवशी परळीच्या पांगरी येथील गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाचा देखील कार्यक्रम यावेळी पार पडत असतो. रामराव महाराजांनी आपल्या कीर्तनातून गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. मुंडेंचं निधन झालं तेव्हा सगळ्यात जास्त पोलीस खातं रडलं असं सांगत रामराव महाराजांनी जुना प्रसंग सांगितला.
Authored by: मानसी देवकरUpdated: |Maharashtra Times