Please enable javascript.Sunil Dutt And Nargis Love Story,दुसरं लग्न केलं तर सुखानं जगू देणार नाही... जेव्हा सुनील दत्त यांना नर्गिस यांनी दिलेली ताकीद, काय आहे किस्सा? - late actor sunil dutt birth anniversary when nargis dutt warned him in dream against remarriage - Maharashtra Times

दुसरं लग्न केलं तर सुखानं जगू देणार नाही... जेव्हा सुनील दत्त यांना नर्गिस यांनी दिलेली ताकीद, काय आहे किस्सा?

Edited by: भाग्यश्री रसाळ|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अभिनेते सुनील दत्त यांचा आज जन्म दिवस. सुनील दत्त यांचं फिल्मी करिअर चर्चेत राहिलं, तितकीच चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही झाली.

  • खबरदार पुन्हा लग्न कराल तर...

    खबरदार पुन्हा लग्न कराल तर...

    सुनील दत्त आणि नर्गिस यांची लव्ह स्टोरीची नेहमीच चर्चा होत आली आहे. आजही लोक त्यांच्या प्रेमाबद्दल बोलतात. त्यांची पहिली भेट एखाद्या चित्रपटासारखीच होती.सुनील दत्त आणि नर्गिस पहिल्यांदा भेटले तेव्हा सुनील दत्त नवीन होते. नर्गिस खूप मोठ्या स्टार होत्या. एका मोठ्या अपघातामुळे ते दोघेही जवळ आले.आजही त्यांच्या प्रेमाची उदाहरणं दिली जातात.


    नर्गिस यांच्या निधानंतर त्या त्यांच्या भाचीच्या स्वप्नात आल्या होत्या. त्यांनी भाचीच्या स्वप्नात येऊन सुनील दत्त यांना दुसरं लग्न न करण्याची ताकीद दिली होती. नर्गिस यांनी स्वप्नात सांगितलं होतं की, " काहीही झालं तरी सुनील यांनी दुसरं लग्न करायचं नाही." हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं होतं. सुनील दत्त आणि नर्गिस यांचं प्रेम खरंच खूप वेगळं होतं. त्यांच्यातील प्रेम आजही लोकांच्या मनात आहे.

  • वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    नर्गिस आणि सुनील दत्त फक्त २३ वर्षं सोबत होते. १९८१ मध्ये नर्गिस यांचं निधन झाले. सुनील दत्त यांनी एकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून नर्गिस यांना वाचवलं होतं .नर्गिस बऱ्या होईपर्यंत सुनील दत्त सतत त्यांच्या सोबत होते. त्यांनी तिची खूप काळजी घेतली. सुनील दत्त आणि नर्सिग यांनी १९५८ मध्ये लग्न केलं. पण नशिबात काहीतरी वेगळेच लिहिलं होतं. १९८१ मध्ये नरगिस ५२ वर्षांच्या असताना वारल्या.

  • सुनील दत्त शांत राहू लागले

    सुनील दत्त शांत राहू लागले

    नर्गिस यांना कॅन्सर झाला होता. त्यांचा मुलगा संजय दत्तचा पहिला चित्रपट 'रॉकी' रिलीज व्हायच्या काही दिवस आधीच त्यांचं निधन झालं होतं.नर्गिस यांच्या जाण्यानं सुनील दत्त खूप दुःखी झाले होते. ते शांत झाले होते. याबद्दल Darlingji: The True Love Story Of Nargis & Sunil Dutt' नावाच्या पुस्तकात माहिती दिली आहे.

  • स्मशानभूमीत एकटे जाऊन बसायचे

    स्मशानभूमीत एकटे जाऊन बसायचे

    सेलिब्रिटींच्या आयुष्यातही अनेक चढ-उतार येतात. त्यांच्या कुटुंबालाही याचा सामना करावा लागतो. सुनील आणि नर्गिस यांची मुलगी प्रिया दत्त हिनं एका मुलाखतीत सांगितलं की, आईचं निधन वडिलांसाठी धक्का होता. वडिलांना खूप वाईट वाटलं होतं. ते खूप दु:खी झाले होते. प्रिया म्हणाली, "माझ्या वडिलांना भीती वाटत होती. ते आता काय करतील, असा प्रश्न मला पडला होता. ते पहाटे 3-4 वाजता उठायचे आणि स्मशानभूमीत एकटे जाऊन बसायचे. त्यांना रात्री झोपही यायची नाही आणि ते कोणतेही काम करू शकत नव्हते.

  • स्वप्नात आलेल्या नर्गिस

    स्वप्नात आलेल्या नर्गिस

    नर्गिस यांच्या निधनानंतर सुनील दत्त सावरण्याचा प्रयत्न करत होते. ते त्यांच्या तीन मुलांचे संगोपन करत होते. पण लोकांना वाटत होतं की त्यांनी दुसरं लग्न करावं. नर्गिस यांची भाची जाहिदा हुसैननं एकदा सांगितलं की, नर्गिस त्यांच्या स्वप्नात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सुनील दत्त यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल ताकीद दिली होती. जाहिदा म्हणाल्या, नर्गिस यांनी सुनील दत्त यांना दुसरं लग्न करण्यापासून सावध केलं होतं.

  • दुसरं लग्नं केलं तर...

    दुसरं लग्नं केलं तर...

    नर्गिस जाहिदा यांच्या स्वप्नात आल्या होत्या. नर्गिस त्यांना म्हणाल्या होत्या, "तुमच्या काकांना सांगा, जर त्यांनी दुसरं लग्न केलं, तर मी त्यांना कधीच शांत बसू देणार नाही." जाहिदानं ही गोष्ट सुनील यांना सांगितली.सुनील यांना आश्चर्य वाटले. नर्गिस त्यांच्या स्वप्नात का आली नाही? आणि ती असं का बोलली, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांना काही कळेना. हे सगळे ऐकून लोकांनाही नवल वाटलं होतं.

  • मी दुसरं लग्न कसं करू शकतो?

    मी दुसरं लग्न कसं करू शकतो?

    सुनील दत्त आणि त्यांची पत्नी यांच्यातील प्रेम खूप खास होते. एकदा सुनील यांनी जाहिदा यांना सांगितलं की, "ती तुझ्या स्वप्नात कशी आली आणि माझ्या स्वप्नात का नाही?".ते पुढे म्हणाले, "पण मी पुन्हा लग्न कसं करू शकतो? माझ्या आयुष्यात दुसरी मिसेस दत्त कधीच येणार नाही. तिला सांग की तिने रिलॅक्स राहावं. मी कधीही दुसरं लग्न करणार नाही." सुनील दत्त आपल्या पत्नीवर किती प्रेम करत होते, हे यातून दिसते.