मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आज या अभिनेत्री आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जातात. आज अशाच एका मराठी अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिनं अपार कष्टानं नाव कमावलं आणि आता ती टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक संकटं आली, पण तिनं त्यावर मात केली. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया.
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती दुसरी-तिसरी कुणीही नसून प्राजक्ता माळी आहे. प्राजक्ता तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. प्राजक्ताचं वय ३५ असून ती अजूनही सिंगल आहे.
एका मुलाखतीदरम्यान, प्राजक्ताने सांगितलेलं की, ती रिलेशनशिपमध्ये होती, पण तिच्या बॉयफ्रेंडने फसवणूक केल्यामुळे तिनं ब्रेकअप केला.
आता प्राजक्ता, मराठीच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने 'जुळून येती रेशीमगाठी' 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' यांसारख्या मालिकांमध्ये तर 'फुलवंती', 'चिकी चिकी बुबुम बूम' यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर प्राजक्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करते.
प्राजक्ताने अभिनयातच नव्हे तर उद्योगक्षेत्रातही पदार्पण केलं. तिनं स्वतःचा 'प्राजक्तराज' नावानं पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केलाय. तिच्या या ब्रँडला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.
इतकंच नव्हे तर प्राजक्ताने कर्जतमध्ये एक फार्महाऊससुद्धा विकत घेतलं आहे. त्यातूनही ती बक्कळ कमाई करतेय. मीडिया रिपोर्टनुसार, प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये विकेंडला जायचं असल्यास दिवसाचं भाडं हे ३० हजार रुपये आहे. तर, इतर दिवशी सोमवार ते शुक्रवार दरम्यान एक दिवसाचं भाडं १७ ते २० रुपये आहे.
प्राजक्ता एका सिनेमासाठी जवळपास १५ ते २० लाख रुपयांचं मानधन घेते. त्यामुळे तिची संपत्ती २ ते ३ कोटींच्या आसपास असण्याची शक्यता आहे.