भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलने धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे नाव आरजे महवशसोबत जोडले जात आहे. दोघे अनेकदा स्पॉट होताना देखील दिसतात.
आता नुकताच आरजे महवश हिने मोठी माहिती युजवेंद्र चहलबद्दल सांगितले आहे. आयपीएल २०२५ मध्ये युजवेंद्र चहल याने तीन फ्रॅक्चर असताना खेळल्याचे तिने म्हटले.
महवशने सांगितले की, चहलला स्पर्धेदरम्यान बरगड्या आणि बोटाला फ्रॅक्चर झाले होते, असे असतानाही त्याने आयपीएलचे सामने खेळली.
पोस्ट करत महवशने म्हटले की, तो लढला, टिकून राहिला आणि शेवटच्या सामन्यापर्यंत खेळला...@yuzi_chahal23 साठी एक खास पोस्ट कारण ज्या लोकांना माहित नाही, त्याच्या बरगड्याला दुसऱ्या सामन्यातच फ्रॅक्चर झाले.
बोटालाही फ्रॅक्चर झाले होते. हा संपूर्ण सीझनमध्ये तीन फ्रॅक्चरसह खेळला.. वेदनेने ओरडताना आणि रडताना पाहिले आहे, पण कधीही त्याने हार मानली नाही. किती जास्त योद्ध्याची भावना आहे. संघासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली..
यासोबतच तिने पुढच्या वर्षी भेटू म्हणत संघाचे देखील काैतुक केले. युजवेंद्र चहलने १४ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या. दुखापतीमुळे त्याला तीन सामने खेळता आली नाहीत.
चहलच्या मनगटाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो काही सामने खेळू शकला नाही. त्यामध्येच महवशने युजवेंद्र चहलसाठी ही खास पोस्ट शेअर केली आहे.