Tejashri Kulaye, महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Jun 3, 2025
अभिनेत्री मौसमी चटर्जी यांनी जयंत मुखर्जी यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुली होत्या. त्यांच्या एका मुलीचं वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झालं.
Image Source: insta/moushumi__chatterjee
मौसमी चटर्जी यांनी सांगितलं की, इंडस्ट्री त्यांच्यावर नाराज होती. त्यामुळे त्यांना फारसं महत्त्व दिलं गेलं नाही. त्या म्हणाल्या, 'मला डावलण्यात आलं, कारण इंडस्ट्री माझ्यावर रागावली होती. इंडस्ट्रीतील लोक माझ्यावर नाराज असल्यामुळे मला काम मिळेना.'
Image Source: insta/moushumi__chatterjee
मौसमी चटर्जी यांनी 'लहरें'ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं.
Image Source: social-media
अभिनेत्री म्हणाली, 'मनोज कुमार माझ्यावर खूप चिडले होते. 'रोटी कपडा और मकान'च्या शूटिंगदरम्यान मी प्रेग्नेंट राहिल्यानं ते नाराज होते.'
Image Source: insta/moushumi__chatterjee
शशी कपूर एकदा म्हणाले होते, 'तू सगळ्या इंडस्ट्रीला त्रास दिला आहेस. सगळ्यांना ट्रॉफी मिळाली, पण तुला नाही. तुझ्यावर कोण 20-30 हजार रुपये खर्च करेल?'
Image Source: insta/moushumi__chatterjee
'मी धरम जींना सांगितलं. एका पुरस्कार सोहळ्यासाठी मला बोलावलं होतं. पण मला ट्रॉफी मिळाली नाही, असं मी त्यांना बोलले.'
Image Source: insta/moushumi__chatterjee
मौसमी प्रेग्नन्ट असल्यामुळे, ते गाणं परवीन बाबी यांना देण्यात आलं.
Image Source: insta/moushumi__chatterjee
'जहरीला इंसान' सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी धक्कादायक घटना घडली. अभिनेत्रीनं सांगितलं की, शूटिंग दरम्यान त्या प्रेग्नेंट होत्या. त्या पडल्या आणि त्यांना रक्तस्त्राव झाला. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सुदैवाने, त्यांचं बाळ सुरक्षित राहिलं. पण दुसऱ्याच दिवशी प्रोड्युसरने त्यांना सेटवर येण्यास सांगितलं.
Image Source: insta/moushumi__chatterjee
मौसमी चटर्जी म्हणाल्या, 'मला अनेक चित्रपटांमधून काढून टाकलं. कारण मी माझ्या आत्मसन्मानाशी तडजोड करू इच्छित नव्हती.'
Image Source: insta/moushumi__chatterjee
Thanks For Reading!