Please enable javascript.Mukesh Ambani Family Net Worth and Daily Income 2025; जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब दिवसाला किती कोटी कमावतात? बिनपगारी तरी मुकेश अंबानी अब्जाधीश | Maharashtra Times

Ambani Family Income : जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब दिवसाला किती कोटी कमावतात? बिनपगारी तरी मुकेश अंबानी अब्जाधीश

Edited by: प्रियांका वर्तक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Ambani Family Income : मुकेश अंबानींचं कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत परिवार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की अंबानी कुटुंबातील सदस्य दररोज किती पैसे कमवतात? मुकेश अंबानींच्या कुटुंबात पत्नी नीता अंबानी, त्यांची तीन मुलं - इशा, आकाश आणि अनंत अंबानींचा समावेश आहे.

  • नीता अंबानी यांचा पगार

    नीता अंबानी यांचा पगार

    सर्वप्रथम मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2,340 ते 2,510 कोटी रुपयांदरम्यान असण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत त्यांचे रोजचे उत्पन्न 20 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

  • अंबानींच्या लाडक्या लेकीची दररोजची कमाई

    अंबानींच्या लाडक्या लेकीची दररोजची कमाई

    आता मुकेश अंबानींची लाडकी लेक आणि रिलायन्स रिटेलच्या अध्यक्षा इशा अंबानी पिरामल यांना वार्षिक 4.2 कोटी रुपये पगार मिळतो. अशाप्रकारे, दैनंदिन उत्पन्न 15 ते 20 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते तर, ईशा अंबानीची एकूण संपत्ती 800 कोटी रुपये आहे.

  • आकाश अंबानींची दिवसाची कमाई किती

    आकाश अंबानींची दिवसाची कमाई किती

    मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा - आकाश - रिलायन्स जिओ​चे अध्यक्ष आहेत. आकाश यांना वार्षिक सुमारे 5.4 कोटी रुपये ​पॅकेज मिळते. आकाश अंबानींची एकूण नेटवर्थ 3300 कोटी रुपये आहे तर ते दररोज 15 ते 20 लाख रुपये कमावतात.

  • अनंत अंबानींचा पगार किती?

    अनंत अंबानींचा पगार किती?

    मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा - अनंत अंबानी - रिलायन्स​च्या एनर्जी व्यवसायात कार्यरत आहेत. अनंत यांना वार्षिक 4.2 कोटी रुपये पगार ​मिळतो तर यानुसार दररोज दररोज 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत मानधन त्यांना दिले जात असावे.

  • मुकेश अंबानींचा पगार किती

    मुकेश अंबानींचा पगार किती

    आर्थिक वर्ष 2021 पासून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर एक रुपयाही पगार न घेण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत कंपनी आणि सर्व व्यवसायांच्या कमाईच्या क्षमतेत वाढ होत नाही तोपर्यंत मुकेश अंबानींनी पगार न घेण्याचा निर्णय घेतला. 2023-24 मध्ये त्यांना पगार, भत्ते आणि इतर सुविधा तसेच ‘शून्य’ निवृत्ती लाभ मिळाले.

  • मुकेश अंबानी कशी कमाई करतात

    मुकेश अंबानी कशी कमाई करतात

    अंबानी यांनी 2021-22 आणि 2022-23 मध्ये आणि 2023-24 मध्ये कोणतेही वेतन घेतले नाही. त्याआधी, व्यवस्थापकीय भरपाई पातळीत संयमाचे उदाहरण मांडण्यासाठी 2008-09 पासून त्यांनी त्यांचा पगार 15 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित केला होता.