MI vs PBKS : २३ वर्षाचं पोरगं जगातील दोन दिग्गज बुमराह आणि बोल्टला भारी पडलं, मुंबईच्या पराभवाचं मुख्य कारण

Updated: |महाराष्ट्र टाइम्स.कॉम

IPL 2025 : आयपीएलमधील दोन दिग्गज गोलंदाजांना २३ वर्षाचा युवा फलंदाज भारी पडलेला दिसला. नेमका कोण आहे जो पंजाबसाठी त्याने विजयाचा पाया रचला.

  • मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला

    आयपीएलमधील ६९ वा सामना सवाई मानसिंग स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यामध्ये मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हाय व्होल्टेज सामन्यात पंजाबचा खेळाडू युवा खेळाडू जड गेला.

  • जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हतबल

    २३ वर्षाच्या पोराने जगातील दिग्गज गोलंदाजांच्या यादीत येणाऱ्या जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनाही त्याने विकेट मिळू दिली नाही.

  • सुरूवातीपासूनच मैदानात ठोकला मुक्काम

    पठ्ठ्याने सुरूवातीपासूनच मैदानात आपला मुक्काम ठोकला होता. मुंबईसारखा तगडा संघ समोर असताना तो घाबरला नाही ना त्याचा आत्मविश्वास खालावला नाही.

  • प्रियांश आर्य

    हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून प्रियांश आर्य असून त्याने ३५ चेंडूत ६२ धावांची आक्रमक खेळी करत विजयाचा खऱ्या अर्थाने पाया रचला.

  • असे आणखी फोटो पाहाDownload App
  • प्रियांशची खेळी ठरली महत्त्वाची

    मुंबईने दिलेल्या १८५ धावांचा पाठलाग करतानामम. कारण त्याने आपली विकेट न गमावता खेळपट्टीवर टिकून राहिला.

  • मुंबईच्या गोलंदाजांचं अपयश

    मुंबईकडून दुसऱ्या विकेटसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांना काही यश आले नाही. दुसरी विकेट मिळेपर्यंत उशिर झाला होता.

  • Loading ...
  • प्रियांशची दमदार कामगिरी

    यंदाच्या सीझनमध्ये प्रियांशने दमदार फलंदाजी केली आहे. १४ सामन्यात त्याने ४२४ धावा केल्या आहेत. तर यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे तर दोन अर्धशतके त्याने केली आहेत.

  • प्रियांशचा डेब्यू सीझन

    विशेष म्हणजे आयपीएलचा प्रियांशचा डेब्यू सीझन असून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे त्याला लवकरच टीम इंडियाची दारेघ उघडली जाऊ शकतात.